Home » Rajyasabha Election 2024 : महाराष्ट्रासह 15 राज्यातील 56 जागांसाठी निवडणूक

Rajyasabha Election 2024 : महाराष्ट्रासह 15 राज्यातील 56 जागांसाठी निवडणूक

Election Commission of India : मतदान होणार 27 फेब्रुवारी रोजी 

by नवस्वराज
0 comment

New Delhi : महाराष्ट्रासह देशातील 15 राज्यातील 56 राज्यसभा जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. या सर्व जागांसाठी 27 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. भारतीय निवडणूक आयोगकडून (ECI) सोमवारी याबाबत घोषणा करण्यात आली. 13 राज्यातील 50 राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ 2 एप्रिल रोजी समाप्त होत आहे. दोन राज्यातील 6 सदस्य 3 एप्रिल रोजी निवृत्त होत आहेत.

ज्या राज्यात राज्यसभा निवडणुका होणार आहेत, त्यामध्ये उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, गुजरात, आंध्र प्रदेश, तेलंगाणा, राजस्थान, कर्नाटक, उत्तराखंड, छत्तीसगड, ओडिशा, हरियाणा आणि हिमाचल प्रदेश आदि राज्यांचा समावेश आहे. ज्या खासदारांचा कार्यकाळ एप्रिल महिन्यात संपणार आहे, त्यामध्ये 9 केंद्रीय मंत्र्यांचा समावेश आहे. यामध्ये भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा (हिमाचल प्रदेश), रेल्वे, आयटी व संचार मंत्री अश्विनी वैष्णव (ओडिशा), आयटी राज्य मंत्री राजीव चंद्रशेखर (कर्नाटक), सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे (महाराष्ट्र), शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान (मध्य प्रदेश), आरोग्य मंत्री मनसुख मंडाविया (गुजरात) आणि पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव (राजस्थान) आहेत. माजी पंतप्रधान मनमोहन सिंह (राजस्थान) यांचा कार्यकाळही यावर्षी एप्रिल महिन्यात संपणार आहे.

उत्तर प्रदेशातील 10, महाराष्ट्र आणि बिहारमधून प्रत्येकी 6, मध्य प्रदेश आणि पश्चिम बंगालमधून प्रत्येकी 5, गुजरात आणि कर्नाटकमधून प्रत्येकी 4, आंध्र प्रदेश आणि तेलंगाणामधून प्रत्येकी 3 आणि छत्तीसगड, हरियाणा, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड राज्यातून प्रत्येकी 1 राज्यसभा खासदार निवृत्त होणार आहेत. महाराष्ट्रातून निवृत्त होणाऱ्या राज्यसभा खासदारांमध्ये नारायण राणे, माजी माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर आणि वरिष्ठ भाजप नेते व्ही. मुरलीधरन यांचा समावेश आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई, एनसीपीच्या वंदना चव्हाण आणि काँग्रेसचे कुमार केतकरही निवृत्त होत आहेत.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!