Home » अकोल्यात महावितरणची जुने शहरावर वक्रदृष्टी

अकोल्यात महावितरणची जुने शहरावर वक्रदृष्टी

by Navswaraj
0 comment

अकोला : शासनाच्या अनेक विभागांचे जुने शहराकडे दुर्लक्ष आहे. महावितरण कंपनीदेखील यात मागे नाही. कंपनीतर्फे ग्राहकांना सुरळीत आणि नियमित वीज पुरवठा करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत असले तरी यात तथ्य नसल्याचे दिसून येते.

वादळ, वारा, पावसामुळे वीज पुरवठा खंडीत झाला तर समजण्यासारखे आहे. परंतु अशी कुठलीही परिस्थिती नसताना वारंवार वीज पुरवठा खंडीत होणे, अचानकपणे वीजेचा दाब वाढणे, कमी होणे ही बाब जुने शहरातील वीज ग्राहकांसाठी नवीन नाही. या समस्येबाबत वीज अधिकाऱ्यांना वेळोवेळी अवगत करण्यात आले आहे. परंतु यात कुठलीही सुधारणा झालेली नाही. याभागातील फिडरवर मोठ्या प्रमाणात वीज गळती व चोरी असल्यामुळे ग्राहकांना अघोषित भारनियमनाला सामोरे जावे लागत आहे. २१ जूनला अगरवेस, गुलजार पुरा, विठ्ठल मंदिर, शिवाजी नगर परिसरातील ग्राहकांनी सकाळ ते सायंकाळ दरम्यान अनेकवेळ वीजेचा लपंडाव अनुभवला.

महावितरण कंपनी वीज गळती व चोरीवर नियंत्रण ठेवण्यात कमी पडत आहे. योग्य देखभालीच्या अभावाचा त्रास प्रामाणिक वीज ग्राहकांना होतो. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी वीज गळती, चोरीचा जप न करता या समस्येवर तोडगा काढावा अशी जुने शहरातील त्रस्त वीज ग्राहकांची मागणी आहे.

error: Content is protected !!