Home » वडील, नातवाच्या उपस्थितीत शिंदेंनी घेतला मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार

वडील, नातवाच्या उपस्थितीत शिंदेंनी घेतला मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार

by Navswaraj
0 comment

मुंबई : रिक्षाचालक ते मुख्यमंत्रिपदापर्यंत असा प्रवास करणारे एकनाथ शिंदे यांच्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी गुरुवार, 7 जुलै सर्वांत मोठा दिवस ठरला. मंत्रालयात एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कुटुंबीय मंत्रालयातील मुख्यमंत्री कार्यालयात आले होते. मुख्यमंत्र्यांचे वडील संभाजी शिंदे, पत्नी लता शिंदे, सूनबाई वृषाली शिंदे आणि नातू सुद्धा यावेळी उपस्थित होते. शिवसेनेचा कार्यकर्त्या, पालिकेचे गटनेता, आमदार, मंत्री आणि आता मुख्यमंत्रिपद असा शिंदे यांचा प्रवास राहिला आहे. स्थापनेपासून शिवसेनेत सर्वांत मोठे बंड करणारे शिंदे पहिले नेते ठरले आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!