Home » सरकारच्या घाईने काढलेल्या शासन निर्णयांना स्थगिती

सरकारच्या घाईने काढलेल्या शासन निर्णयांना स्थगिती

by नवस्वराज
0 comment

मुंबई : महाविकास आघाडी सरकारने १९ जूननंतर काढलेल्या शासन निर्णयांना (जीआर) स्थगिती देण्याचे नवीन सरकारने ठरविले आहे. त्यासाठी सर्व खात्यांनी काढलेल्या जीआरची माहिती मागविण्याचे निर्देश मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांना देण्यात आले.

सरकार जाणार, अशी परिस्थिती दिसू लागल्यावर आघाडी सरकारने झपाट्याने निर्णयांचा सपाटा लावला. सत्ताधारी आमदारांच्या मतदारसंघातील व अन्य कामांना निधी मंजूर करून घेतला. धोरणात्मक निर्णयही घेतले. गेल्या १०-१२ दिवसांत सुमारे ६०० शासननिर्णय जारी करण्यात आल्याचा अंदाज असून अनेक निर्णय शासकीय संकेतस्थळावर टाकण्यात आले नाहीत. या संदर्भात  विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे तक्रार केली होती आणि त्यांनीही मुख्य सचिवांकडून माहिती मागविली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेवर येताच गेल्या काही दिवसांत घाईने काढल्या गेलेल्या संशयास्पद निर्णय आणि शासननिर्णयांना स्थगिती देण्याचे ठरविले आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!