Home » अनिल देशमुख, नवाब मलिक यांच्या मतदानाला ईडीचा विरोध

अनिल देशमुख, नवाब मलिक यांच्या मतदानाला ईडीचा विरोध

by Navswaraj
0 comment

मुंबई : राज्यसभा निवडणुकीची मतदानाची परवानगी मिळावी यासाठी अनिल देशमुख, नवाब मलिक यांनी केलेल्या अर्जाला ईडीने विरोध केला आहे. मुंबई सत्र न्यायालयातील पीएमएलए न्यायालयात याबाबत सुनावणी होणार आहे.

सक्त वसुली संचालनालयाने घेतलेल्या या भूमिकेमुळे महाविकास आघाडीच्या अडचणीत वाढ झाली आहे. अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांनी मतदान करण्याकरिता मागितलेल्या परवानगीवर ईडीकडून उत्तर दाखल करण्यात आले आहे. विधानसभेतील आमदारांचे संख्याबळ आणि राज्यसभेच्या विजयाचा कोटा या दोन्हीचा ताळमेळ बसून सहाव्या जागेवरील उमेदवार विजयी होण्यासाठी भाजप आणि महाविकास आघाडी दोघांनाही अपक्ष आमदारांची मदत लागणार आहे. अशात देशमुख आणि मलिक यांचा पत्ता कट झाल्यास महाविकास आघाडीची मोठी अडचण होणार आहे.

विधानसभेत १३ अपक्ष आमदार तर छोट्या पक्षांचे १६ आमदार आहेत. राष्ट्रवादीचे ५३ आमदार असून माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि मंत्री नवाब मलिक हे तुरुंगात आहेत. त्यांना मतदानासाठी परवानगी मिळावी यासाठी राष्ट्रवादीने न्यायालयात अर्ज केला आहे. अशात महाविकास आघाडी आणि भाजप दोघांनाही अपक्ष आमदारांची मदत लागणार आहे.

error: Content is protected !!