Home » चंद्रपूर, गडचिरोलीसह तेलंगणा राज्यात भूकंपाचे धक्के

चंद्रपूर, गडचिरोलीसह तेलंगणा राज्यात भूकंपाचे धक्के

by Navswaraj
0 comment

नागपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिंपरी तालुका तसेच गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील महागाव (बु.) येथे भूकंपाचे सौम्य धक्के बसले आहेत. तेलंगणा राज्यातही काही भागांना भूकंपाचे सौम्य धक्के बसले आहेत. भूकंपाची तीव्रता ३.१ रिष्टर स्केल होती.

मंगळवार, २१ मार्च २०२३ रोजी जमिनीच्या ५ किलोमीटर आत हे धक्के बसल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे. गोदावरी फॉल्ट परिसर हा भूकंपप्रवण भाग असल्याचे सांगितले जात आहे. मंगळवार, २१ मार्च रोजी सकाळी ८.४२ वाजता तेलंगणा राज्यातील कागझनगरजवळील दहेगाव भागात हे भूकंपाचे धक्के जाणवले. यानंतर चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिंपरी तालुक्यात आणि गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील महागाव येथेही भूकंपाचे धक्के जाणवले.

error: Content is protected !!