Home » Tadoba Mahotsav : ‘ड्रिमगर्ल’ म्हणाल्या मथुरेत कृष्ण मंदिराचे स्वप्न लवकरच साकार होणार

Tadoba Mahotsav : ‘ड्रिमगर्ल’ म्हणाल्या मथुरेत कृष्ण मंदिराचे स्वप्न लवकरच साकार होणार

Hema Malini : जगातील 20 कोटी लोकांपर्यंत पोहोचला ताडोबा महोत्सव

0 comment

Chandrapur News : तीन दिवस सुरू असलेल्या ताडोबा महोत्सवासाठी खासदार हेमा मालीनी चंद्रपूर येथे आल्या होत्या. वन, सांस्कृतिक कार्य तथा मत्स्य व्यवसाय मंत्री व पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या समवेत चांदा क्लब ग्राऊंड येथे आयोजित पत्रपरिषदेत खासदार हेमा मालीनी यांनी विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी हेमा मालीनी म्हणाल्या, गेल्या दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठ्या प्रमाणात विकासकामे केली आहेत. त्यामुळे 2024 मध्ये भाजप व मित्र पक्ष 400 जागांचा टप्पा निश्चितच पार करतील. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मथुरा येथील रस्ते व अन्य कामांसाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. लवकरच मथुरा व वृंदावनला विकास कामांमध्ये प्रथम क्रमांकावर न्यायचे आहे असेही हेमा मालीनी म्हणाल्या. मथुरेत कृष्ण मंदिर लवकरच साकार होणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

भाजपाने प्रसारीत केलेल्या प्रथम यादीत स्थान मिळाल्याबद्दल हेमा मालीनी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा व मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे आभार मानले. पंतप्रधान मोदींनी महिलांसाठी मोठ्या प्रमाणात चांगली कामे केली असल्याचे त्या म्हणाल्या. ताडोबा महोत्सवात गंगा नृत्य सादर करणार आहे. गंगा नदीचा थेट पर्यावरणाशी संबंध आहे. मागील दहा वर्षात नमामी गंगे कार्यक्रमांतर्गत नदी स्वच्छता व सुंदरतेची कामे मोठ्या प्रमाणात झाली असेही हेमा मालीनी सांगीतले. ताडोबा महोत्सवाच्या आयोजनाबद्दल वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या कामाचे हेमा मालीनी यांनी कौतुक केले. 30 वर्षांनंतर चंद्रपुरात आली असून मोदी युगात या शहरात मोठ्या प्रमाणात बदल झाल्याचे त्या म्हणाल्या. मथुरेतून तिसऱ्यांदा लोकसभेत निवडून जाणार असा विश्वास हेमा मालीनी यांनी यावेळी व्यक्त केला. मंत्रिपदाची जबाबदारी मिळाली तर स्वीकारणार असल्याचे त्यांनी सांगीतले. भाजपाने प्रसारित केलेल्या उमेदवारांच्या पहिल्या यादीत 28 महिलांना उमेदवारी दिली असली तरी उर्वरीत यादीत महिलांना स्थान मिळेल असेही हेमा मालीनी यांनी सांगितले.

20 कोटी लोकांपर्यंत महोत्सव

जगाच्या 20 देशातील विश्वसुंदरींनी या महोत्सवात हजेरी लाऊन कौतुक केले आहे. या महोत्सवाची चर्चा केवळ भारतातच नव्हे तर देशविदेशातून देखील या महोत्सवावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. तीन दिवसाच्या या महोत्सवाने चंद्रपूर, ताडोबा व ताडोबातील वाघ आकर्षणाचे केंद्र बनला आहे. महोत्सवासाठी आमंत्रित केल्याबद्दल खासदार हेमा मालीनी यांनी वन, सांस्कृतिक कार्य तथा मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आभार मानले.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!