Home » गर्भाबाबत डॉक्टरांना हलगर्जीपणा भोवला

गर्भाबाबत डॉक्टरांना हलगर्जीपणा भोवला

by Navswaraj
0 comment

यवतमाळ : महिलेस गर्भधारणा झाल्यानंतर वैद्यकीय तपासणीत हयगय केल्याने अपंग अपत्य जन्माला आले. याप्रकरणी महिलेच्या पतीने ग्राहक मंचात येथील दोन डॉक्टरांविरुद्ध तक्रार दाखल केली. ग्राहक आयोगाने या प्रकरणी येथील दोन डॉक्टरांना दोषी ठरवत ४० लाख रुपये दंड ठोठावला आहे. यात एका स्त्रीरोग तज्ज्ञासह एका सोनोग्राफी तज्ज्ञाचा समावेश आहे.

आर्णी येथील श्रीकांत वसंतराव राठोड यांनी दाखल केलेल्या तक्रारीवर २० सप्टेंबर रोजी आयोगाने दिलेल्या या निर्णयाने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. प्रसूतीनंतर नवजात बाळाच्या दोन्ही हाताला प्रत्येकी चार बोटे होती. पायाला हाड नव्हते, पाय व पायाची बोटेही व्यवस्थित नव्हती. त्यामुळे श्रीकांत राठोड यांनी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे धाव घेत तपासणीत स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर आणि सोनोग्राफी तज्ज्ञांची हयगय झाल्याने नुकसानभरपाई मिळावी, यासाठी तक्रार दाखल केली.

यवतमाळ जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष नंदकुमार वाघमारे, सदस्य हेमराज ठाकूर यांच्या उपस्थितीत या तक्रारीवर सुनावणी झाली. यात डॉक्टर दोषी आढळले. आयोगाने दोन्ही डॉक्टरांवर ठपका ठेवला. तक्रारकर्ते श्रीकांत राठोड यांना प्रत्येकी २० लाख रुपये अशी एकूण ४० लाख रुपये भरपाई द्यावी, मानसिक व शारीरिक त्रासापोटी प्रत्येकी दहा हजार आणि तक्रार खर्चाचे तीन हजार द्यावे, असा आदेश दिला आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!