जिल्हा परिषदेतर्फे श्रमदान, आरोग्य तपासणी व रॅली काढून आरोग्य दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त श्रमदान, स्लोगन व मार्गदर्शन, आरोग्य तपासणी तसेच रांगोळी स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले. “आमची पृथ्वी आमचं आरोग्य” हे सन २०२२ चे आरोग्य दिनाचे घोष वाक्य आहे. त्यानुसार रॅली काढून नागरिकांचे प्रबोधन व मार्गदर्शन करण्यात आले.
सीईओ अविश्यांत पंडा यांनी आरोग्य दिनाच्या रॅलीला हिरवी झेंडी दाखवून रॅली प्रारंभ केली. रॅलीमध्ये आरोग्य विभागातील अधिकारी- कर्मचाऱ्यांसह मुख्यालयातील अधिकारी तसेच कर्मचारी उपस्थित सहभागी झाले होते. प्लास्टिक पिशव्यांचा वापर न करणे, झाडे लावा-झाडे जगवा, प्रदूषण टाळा, पाण्याचे संवर्धन करा, अशा विषयावर जनजागृती करण्यात आली.