Home » नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातच ज्वाला धोटे आणि अधिकऱ्यांमध्ये वाद

नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातच ज्वाला धोटे आणि अधिकऱ्यांमध्ये वाद

by Navswaraj
0 comment

नागपूर : नागपुरातील वेश्यावस्ती गंगा-जमुना बंद केल्यापासून पोलिस विभाग आणि ज्वाला धोटे यांच्यात वाद सुरू आहे. शनिवारी (ता. १८ जून) धोटे आणि पोलिस अधिकाऱ्यांमध्ये पोलिस आयुक्त कार्यालयातच वाद झाला.

पोलिस आयुक्त कार्यालयात भाजपाचे नेते आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषद घेतल्याचा आरोप आहे. त्यांना पत्रकार परिषद घेऊ देता, मग आम्हालाही घ्यायची आहे, असे म्हणत धोटे यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. भाजपाच्या नेत्यांवर गुन्हा दाखल करा अशी मागणी त्यांनी केली. ज्वाला धोटे या शनिवारी काही पदाधिकाऱ्यांसोबत पोलीस आयुक्त कार्यालयात पोहचल्या. यावेळी त्यांनी भाजपाने पत्रकार परिषद घेतलेल्या सहाव्या मजल्यावर कॉन्फरन्स हॉलमध्ये जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी मज्जाव केला. तेव्हा पोलीस आणि ज्वाला धोटे यांच्यात शाब्दिक वाद झाला.

error: Content is protected !!