Home » यवतमाळ-अमरावती धावत्या ‘शिवशाही’ची डिझेल टाकी निखळली

यवतमाळ-अमरावती धावत्या ‘शिवशाही’ची डिझेल टाकी निखळली

by नवस्वराज
0 comment

अमरावती : यवतमाळ-अमरावती या धावत्या ‘शिवशाही’ बसची डिझेल टाकी रस्त्यावर निखळली. ही बाब चालकाच्या लक्षात येताच त्याने बस रस्त्याच्या कडेला थांबविल्याने मोठा अनर्थ टळला.

बडनेरा (अमरावती) आगाराची वातानुकूलित शिवशाही बस (क्रमांक एम. एच ०९/ ईएम २२६०) ही यवतमाळ आगारातून अमरावतीकडे ५० प्रवासी घेऊन निघाली. नेर तालुक्यातील मालखेड गावानजीक धावत्या बसची डिझेल टाकी अचानक तुटली. मोठा आवाज झाल्याने चालकाने बस रस्त्याच्या कडेला घेतली, तेव्हा टाकी निखळल्याचे आढळले. ही बाब लक्षात आली नसती तर चालत्या बसमध्ये डिझेल टाकीचा स्फोट होऊन मोठी दुर्घटना घडली असती. या घटनेनंतर बस चालक, वाहकाने प्रवाशांना बसखाली उतरवून अन्य बसने अमरावतीला पाठविण्याची व्यवस्था केली. या घटनेने प्रवाशांमध्ये भीती पसरली होती.

डिझेल टाकी निखळलेल्या बसमधील प्रवाशांना पाठीमागून आलेल्या दुसऱ्या शिवशाही बसने अमरावतीला पाठविण्याची व्यवस्था करण्यात आली. मात्र त्या बसमध्येही (क्र. एमएच ०६/बीडब्ल्यू ३५७४) तांत्रिक बिघाड असल्याने ती सुद्धा अमरावतीपर्यंत पोहोचण्याची शाश्वती नसल्याची माहिती चालक, वाहकाने प्रवाशांना दिली. त्यामुळे प्रवाशांनी परिवहन महामंडळाच्या कारभाराबद्दल रोष व्यक्त केला. राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) कुठलीही देखभाल नसलेल्या बसगाड्या प्रवाशांसाठी जीवघेण्या ठरत आहेत.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!