Home » आदिवासी समाज बांधवांचा जिल्हा कचेरीवर धडक मोर्चा

आदिवासी समाज बांधवांचा जिल्हा कचेरीवर धडक मोर्चा

by Navswaraj
0 comment

अकोला : आदिवासी बांधवांवर स्वतंत्र पूर्व काळापासून अन्याय अत्याचार होत आहे. मणिपूर राज्यात ४ मे रोजी तीन महिलांची विवस्त्र धिंड काढून देशाला काळीमा फासणारी घटना घडली. या घटनेला जवळपास अडीच महिने झाले. मात्र याबाबत मणिपूर व केंद्र सरकारकडून मौन बाळगण्यात आले आहे.

याचा निषेध करण्यासाठी आदिवासी समाज संघटनांच्या नेतृत्वात आदिवासी बांधवांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक( इर्विन) ते जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी डोक्याला काळ्या फिती बांधून विशेषतः महिला, तरुणी मोठया संख्येने सहभागी झाले. आदिवासी संघटनांच्या म्हणण्यानुसार आदिवासी बांधवांवर स्वतंत्र पूर्व काळापासून अन्याय अत्याचार होत आले आहे. आजही आदिवासी देशात सुरक्षित नाही. मणिपूर सारख्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. मात्र, शासन उदासीन असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. मणिपूर राज्यात हिंसेचे वातावरण असून नागरिक आजही भयभीत आहेत. महिलांची धिंड काढणाऱ्यांवर आजवर कारवाई करण्यात आली नाही. असे प्रकार करणा-या नराधमांना अभय मिळाल्याने देशात इतरत्रही अशा घटना घडत आहेत हे अतिशय संतापजनक आहे.

यावेळी माजी महापौर वंदना कंगाले, महानंदा टेकाम, सीमा मरकाम, उमा घासले, संजीवनी मडावी, सुरेखा उईके, नलिनी सिडाम, सविता तुमडाम, शकुंतला मरसकोल्हे, शोभा कुरसंगे, प्रमिला ठाकरे, सुनीता पेंदाम, जयश्री मरापे, शीला गायकी, सविता उईके, मंजुषा परतेती, सुनीता सिसोदे, शोभा मालवे, अर्चना धुर्वे, कांचन किरनाके, संगीता कराडे, सुलोचना राऊत, पूनम राठोड, पर्वता मरसकोल्हे यांच्यासह मोठ्या संख्येने आदिवासी बांधव उपस्थित होते.

आंदोलनात ऑल इंडिया आदिवासी एम्पॉईज फेडरेशन, भिवसन ग्रुप जेवड नगर, आदिवासी युवा क्रांती दल, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, ट्रायबल फोरम, बिरसा क्रांती दल, ऑल इंडिया पीपल्स फेडरेशन, हलबा हलबी संघटना, अखिल गोंडवाना कोया पुणेम, भुमक सेवा संस्था आदी संघटना सहभागी झाल्या होत्या.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!