मुंबई : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात झाली. या अधिवेशनात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अनवाणी पायानेच पोहोचले.
कामकाज सुरु होण्यापूर्वी देवेंद्र फडणवीस विधानसभेत दाखल झाले आणि थेट विधिमंडळाच्या आवारात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी निघाले. त्याचवेळी पाऊसही पडत होता. फडणवीसांनी सर्वात आधी पायातले बूट काढले आणि महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केलं. त्यानंतही बूट न घालताच अनवाणी पायानेच फडणवीस थेट विभानभवनाच्या सभागृहाकडे निघाले. बूट भिजू नयेत आणि बुटांची घाण सभागृहात लागू नये म्हणून हातातच बूट घेऊन ते विधानभावनात पोहचले. त्यांचा हाच फोटो सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. भाजपच्या आमदारांकडूनही त्यांच्यांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. भाजपच्या अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांनी हाच फोटो ट्विट करत ‘संघ संस्कारांचा स्वयंसेवक नेता’ अशी कॅप्शन दिली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ही बाब शिकण्यासारखी आहे, अशी प्रतिक्रिया काही नेटकऱ्यांनीही दिली आहे.