Home » अकोल्यात पोषण आहार : विद्यार्थी उपाशी कंत्राटदार तुपाशी

अकोल्यात पोषण आहार : विद्यार्थी उपाशी कंत्राटदार तुपाशी

by Navswaraj
0 comment

अकोला : कोरोनाच्या महासाथीमुळे शाळा बंद होत्या. शाळा सुरू झाल्यावरही काही तांत्रिक अडचणीमुळे मागील दीड वर्षांपासून विद्यार्थ्यांना पोषण आहार पुरविणे बंद होते. आजही पोषण आहाराच्या बाबतीत संभ्रम कायम आहे.

पोषण आहार वितरणाचा मार्ग मोकळा झाल्यानंतर १ जानेवारी २०२३ पासून शाळांमध्ये आहार पुरविणे सुरू झाले आहे. मध्यवर्ती केंद्रावर अन्न शिजवले जाते. ठरलेल्या वेळी, विद्यार्थ्यांची संख्या आणि शासनाने विहित केलेले नियम व प्रमाणानुसार शहरातील महानगरपालिका व जिल्हा परिषद शाळांना शिजलेला शोषण आहार पुरविला जातो.
मात्र गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थ्यांना पोषण आहार वेळवर मिळत नाही. नियमानुसार पूर्ण आहार नसतो. कधी भात, तर कधी फक्त भाजीच देण्यात येते. त्यामुळे विद्यार्थ्यांना सुयोग्य आहार मिळण्यात अडचण निर्माण होते आहे. पोषण आहार सुरू झाल्यामुळे विद्यार्थी घरून जेवणाचे डबे आणत नाहीत. अशात अपूर्ण आहार मिळत असल्याने विद्यार्थ्यांना उपाशी रहावे लागत आहे.

आहार विलंबाने पोहोचणे तर नित्याचेच झाले आहे. विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार आहार नसतो. नियमानुसार पोषक घटक आहारात नसतात. याबाबत मुख्याध्यापकांनी वारंवार तक्रार दिल्या आहेत. जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन देऊनही यात कोणतीही सुधारणा झालेली नाही.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!