Home » आमदार यशोमती ठाकूर यांना ट्विटरच्या माध्यमातून जीवे मारण्याची धमकी

आमदार यशोमती ठाकूर यांना ट्विटरच्या माध्यमातून जीवे मारण्याची धमकी

by Navswaraj
0 comment

अमरावती : काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. ट्विटरच्या माध्यमातून त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

‘भारतातील थोर महापुरुष तसेच संतांबद्दल मनोहर कुलकर्णी ऊर्फ भिडे गुरुजी सतत काहीतरी बरळत असतो त्याला तात्काळ अटक करावी अशी फक्त आमचीच नाही तर समस्त लोकांची मागणी आहे. सरकार आमच्यावर गुन्हे दाखल करु शकते पण मनोहर कुलकर्णी जो आताही बरळतच आहे त्याच्यावर कसल्याही प्रकारची कारवाई करताना दिसत नाही आहे यावरुनच त्यांचा हेतु काय हे स्पष्ट होते. ज्यांनी देशासाठी आपलं सर्वस्व अर्पण केलं त्या महापुरुषांची निंदानालस्ती भिडे कडुन सतत चालु आहे. त्याबद्दल सरकारमधील कोणीही बोलत नाही आहे. तुम्ही आमच्यावर कितीही गुन्हे दाखल केले तरी आम्ही जोपर्यंत भिडेवर कारवाई होत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही,’ असे आमदार यशोमती ठाकूर म्हणाल्या होत्या. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक – अध्यक्ष संभाजी भिडे यांच्या अमरावती येथील कार्यक्रमात महात्मा गांधींबद्दल वादग्रस्त वक्तव्य करण्यात आले होते. या विरोधात आक्रमक भूमिका मांडणाऱ्या काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!