Home » मेळघाटातील सुसर्दा वन परिक्षेत्रात वाघाचा मृत्‍यू

मेळघाटातील सुसर्दा वन परिक्षेत्रात वाघाचा मृत्‍यू

by Navswaraj
0 comment

अमरावती : मेळघाट प्रादेशिक वनविभागाच्‍या अंतर्गत सुसर्दा वनपरिक्षेत्रातील हिराबंबई वन वर्तूळात एका वाघाचा मृत्‍यू झाल्‍याचे निदर्शनास आले आहे.

हिराबंबई नजीक जंगलात वन कर्मचारी नियमित गस्‍तीवर असताना गुरूवारी सकाळी एक वाघ मृतावस्‍थेत आढळून आला. वाघाचा मृत्‍यू नैसर्गिक असल्‍याचे वन अधिकाऱ्यांनी स्‍पष्‍ट केले आहे.

वन परिक्षेत्र अधिकारी शुभांगी डेहनकर यांनी घटनास्‍थळी पोहचून पाहणी केली. गेल्‍या ऑगस्‍टमध्‍ये धारणी तालुक्‍यातील दादरा गावानजीक वाघाचा वावर आढळून आला होता.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!