Home » देवेंद्र फडणवीस यांची अकोल्यात सभा

देवेंद्र फडणवीस यांची अकोल्यात सभा

by Navswaraj
0 comment

अकोला : मोदी सरकारच्या नऊ वर्षपूर्तीनिमित्त केंद्राने केलेली कामे लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस १८ जून २०२३ रोजी अकोल्यात जाहीर सभा घेणार आहेत. अकोला क्रिकेट क्लबच्या मैदानावर सायंकाळी पाच वाजता ही सभा होणार आहे. सभेच्या अनुषंगाने पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी आज अकोला क्रिकेट क्लब मैदानाचा आढावा घेतला.

उपमुख्यमंत्र्यांची सभा असल्याने पाच ठिकाणी वाहन पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. भाटे क्लब, रतनलाल प्लॉट उर्दू शाळा, आगरकर कन्या शाळा यांचाही पार्किंग व्यवस्थेत समावेश करण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, अभियानाचे संयोजक आमदार प्रवीण दरेकर उपस्थित राहणार आहे. फडणवीस यांचे विशेष विमानाने शिवणी विमानतळावर आगमन होणार आहे. त्यानंतर ते थेट सभास्थळी पोहोचतील व नागरिकांना संबोधित करतील.

error: Content is protected !!