Home » वेदांत माधवनने डॅनिश ओपन जलतरण स्पर्धेत पटकावले सुवर्णपदक

वेदांत माधवनने डॅनिश ओपन जलतरण स्पर्धेत पटकावले सुवर्णपदक

by admin
0 comment

नवी दिल्ली : भारताचा नवोदित जलतरणपटू वेदांत माधवनने शानदार फॉर्म सुरू ठेवत कोपनहेगनमधील डॅनिश ओपनमध्ये पुरुषांच्या ८०० मीटर फ्रीस्टाइल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे. सोळा वर्षीय माधवनने वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी केली आणि ०८:१७.२८ अशी वेळ नोंदवली. त्याने स्थानिक जलतरणपटू अलेक्झांडर एल. ब्योर्नचा ०.१० सेकंदांनी पराभव केला.

प्रसिद्ध अभिनेते आर. माधवन यांचा मुलगा वेदांतने त्याच्या कामगिरीत बरीच सुधारणा केली आहे. त्याची कामगिरी प्रत्येक स्पर्धेनुसार चांगली होत आहे. यापूर्वी त्याने १५०० मीटर फ्रीस्टाईलमध्ये रौप्यपदक जिंकले होते. २०० मीटर फ्रीस्टाईलमध्ये त्याने त्याच्या वेळेत सुधारणा केली. अनुभवी भारतीय जलतरणपटू साजन प्रकाशने पुरुषांच्या १०० मीटर बटरफ्लाय ‘ए’ फायनलमध्ये ५४.२४ सेकंद वेळेसह पाचवे स्थान पटकावले.

त्याचवेळी तनिश जॉर्ज मॅथ्यू सीने ५६.४४ गुणांसह अंतिम फेरीत अव्वल स्थान पटकावले. हीट्समधील अव्वल आठ जलतरणपटू ए अंतिम फेरीसाठी पात्र ठरतात. पुढील आठ बी मध्ये उतरतात आणि पुढील आठ सी मध्ये उतरतात. महिला विभागात शक्ती बालकृष्णनने २०० मीटर फ्रीस्टाइलमध्ये ४२ जलतरणपटूंपैकी ३४ वे स्थान पटकावले. या स्पर्धेत भारताला आतापर्यंत दोन सुवर्ण आणि एक रौप्यपदक मिळाले आहे.

error: Content is protected !!