Home » अकोल्यात अवकाळी पावसाने हरभरा, गव्हाचे मोठे नुकसान

अकोल्यात अवकाळी पावसाने हरभरा, गव्हाचे मोठे नुकसान

by Navswaraj
0 comment

अकोला : अवकाळी पावसाने अकोला जिल्ह्यात हरभरा, गव्हाचे नुकसान झाले आहे. हवामान विभागाने दर्शविलेल्या अंदाजानुसार गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. अशात बुधवार, ४ डिसेंबर २०२२ रोजी सायंकाळी जिल्ह्यात माध्यम स्वरूपाचा पाऊस झाला.

या अवकाळी पावसामुळे गहु आणि हरभऱ्याला फटका बसला आहे. ढगाळ वातावरणाने तुरीवरही अळ्या पडत आहेत. आता पावसामुळे आणखी दोन पिकांवर संकट ओढवले आहे. हरभरा आणि गव्हावर आलेल्या किडीमुळे शेतकरी आधीच हैराण आहेत. त्यात अवकाळी पावसामुळे संकट गडद झाले आहे. हिवाळ्यामध्ये अवकाळी पावसाने लावलेली हजेरी शेतकऱ्यांसाठी चिंताजनक आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!