Home » अकोल्यात ढगाळ वातावरणामुळे तुरीवर अळ्यांच्या प्रादुर्भाव

अकोल्यात ढगाळ वातावरणामुळे तुरीवर अळ्यांच्या प्रादुर्भाव

by नवस्वराज
0 comment

अकोला : काही दिवसांपासून राहणाऱ्या ढगाळ वातावरणामुळे तुरीवर शेंगा पोखरणाऱ्या अळ्यांचा प्रादूर्भाव वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञांकडून हा ईशारा देण्यात आला आहे.

ढगाळ वातावरणाने शेंगा पोखरणारी अळी, पिसारी पतंग व शेंगे माशीचा प्रादुर्भाव होऊ शकतो, असे तज्ज्ञ सांगत आहेत. डिसेंबरमध्येही सातत्याने वातावरणात बदल होत आहे. तीव्र थंडी, मध्येच ढगाळ वातावरण, उकाडा आणि पावसाची शक्यता असे चित्र दिसत आहे. भारतीय मौसम विभागाच्या नागपूर वेधशाळेने विदर्भात काही ठिकाणी पावसाचा ईशारा दिला आहे. साेमवारी १२ आणि मंगळवारी १३ डिसेंबरला विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. पश्चिम विदर्भाच्या तुलनेत पूर्व विदर्भात पावसाची शक्यता अधिक आहे. तूर्तास पश्चिम विदर्भात पावसाचा ईशारा नसला तरी ढगाळ वातावरण तुरीसाठी नुकसानकारक मानले जात आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!