Home » हजेरीसाठी रॅप गायक बादशाहला नागपूर न्यायालयाचा अंतिम ईशारा

हजेरीसाठी रॅप गायक बादशाहला नागपूर न्यायालयाचा अंतिम ईशारा

by Navswaraj
0 comment

नागपूर : गायक रॅपर बादशाह उर्फ आदित्य प्रतीकसिंह सिसोदियाविरुद्ध तक्रार प्रकरणी नागपूर कोर्टाने त्याला ७ फेब्रुवारीला कोर्टात हजर राहण्यासाठी अल्टीमेटम दिला आहे. अश्लील गाणे गायल्याच्या आरोपात त्याच्या विरोधात आहे.

बादशाहला उत्तर देण्याची अंतिम संधी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी एस. एस. जाधव यांनी दिली आहे. बादशाहने हजर राहावे अन्यथा त्याची बाजू न ऐकताच निकाल दिला जाईल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. प्रकरणातील तक्रारकर्ते आनंदपालसिंग गुरुपालसिंग जब्बाल यांच्या वकिल रसपाल रेणू यांनी न्यायालयाच्या निदर्शनास ही बाब आणली की बादशाह सातत्याने वकिल बदलत चालढकल करीत आहे. बादशाहने आत्तापर्यंत अनेकदा वकील बदलले.

नागपुरातील पाचपावली पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. त्याला तक्रारीची प्रत देण्यात आली होती. याप्रकरणी बादशाहच्या आवाजाचे नमुने घ्यायचे आहेत. गायक हनी सिंग याच्या आवाजाचे नमुने आतापर्यंत घेण्यात आले आहे. मात्र बादशाह टाळाटाळ करीत आहे. रॅप गायक हिरदेशसिंग सरबजितसिंग ऊर्फ हनीसिंग (यो यो हनीसिंग) आणि आदित्य सिंग उर्फ बादशाह यांच्याविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अवमान याचिका दाखल करण्यात आली आहे. दोन्ही गायकांनी पोलिसांना पूर्ण सहकार्य करण्याची ग्वाही दिली होती. परंतु त्यानंतरही बादशाहने आवाजाचे नमुने दिलेले नाहीत, असा आरोप आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!