Home » आयातीमुळे कापसाचे भाव पडले : अनिल देशमुख

आयातीमुळे कापसाचे भाव पडले : अनिल देशमुख

by नवस्वराज
0 comment

नागपूर : मागील वर्षी चांगला भाव मिळाल्याने राज्यात यावर्षी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कापसाचा पेरा केला. परंतु अतिवृष्टीमुळे कापसाचे उत्पादन कमी झाले. देशातील कापड उद्योगोला फायदा मिळण्यासाठी कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाच्या दबावाखाली येत मोठ्या प्रमाणात विदेशातून कापसाची आयात करण्यात येत असल्याने देशाअंतर्गत कापसाचे भाव पडल्याचा गंभीर आरोप माजी गृहमंत्री व तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी केला.

राज्यात गेल्या हंगामात जवळपास ३९.३६ लाख हेक्टरमध्ये कापसाचा पेरा झाला होता. खुल्या बाजारात याच वर्षी कापसाला १२ हजार ५०० रुपये भाव मिळाला होता. चांगला भाव मिळाल्यामुळे यंदाच्या हंगामात राज्यात सात टक्के कापसाचा पेरा वाढुन तो ४२.११ लाख हेक्टरपर्यंत झाला. यावर्षीही मागील वर्षीसारखाच भाव मिळेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. परंतु मोठ्या प्रमाणात कापसाची आयात झाल्याने देशाअंतर्गत कापसाचे भाव पडले.

यावर्षी कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाच्या माध्यमातून केंद्र सरकारवर दबाव निर्माण करुन कापूस व सूताचा तुटवडा असल्याचा हवाला देत सप्टेंबर व ऑक्टोंबर २०२२च्या काळात कापसावरील आयातीवर असलेले ११ टक्के शुल्क हे माफ करण्यात आले. यामुळे कापड उद्योजकांनी मोठ्या प्रमाणात कापसाच्या गाठी  विदेशातून आयात केल्या. शुल्क माफ करताच १२ लाख गाठींची आयात करण्यात आली. नुकतेच काही दिवसांपूर्वी परत चार लाख गाठींची विदेशातून आयात करण्यात आली. मागील वर्षी ४३ लाख गाठी निर्यात झाल्या होत्या . परंतु यावर्षी केवळ ३० लाख गाठी निर्यात करण्यात आल्या . जवळपास मागील वर्षीच्या तुलनेत १३ लाख गाठीची निर्यात कमी झाली. यामुळेच देशाअंतर्गत कापसाचे भाव पडले आहे.

सध्या बाजारात कापसाला ६ हजार ५०० ते ६ हजार ८०० रुपये भाव मिळत आहे. यातून साधा उत्पादन खर्च सुद्धा निघत नाही. दुसरीकडे भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी कापूस बाजारात आणला नाही. घरात बर्याच दिवसापासून कापूस असल्याने सध्या त्याची प्रतसुद्धा घसरली आहे. इतकेच नाही तर वाढत्या तापमानामुळे कापसाच्या वजनात सुद्धा घट झाली आहे. बऱ्याच दिवसापासून कापूस घरात असल्याने त्यात पडलेल्या किड्यांमुळे अनेक शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना त्वचेच्या रोगाच्या सुध्दा समस्या अनेक भागात निर्माण झाल्या आहेत.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!