Home » कंत्राटी वीज कामगारांचा १ नोव्हेंबरला मंत्रालयावर मोर्चा

कंत्राटी वीज कामगारांचा १ नोव्हेंबरला मंत्रालयावर मोर्चा

by नवस्वराज
0 comment

अकोला : राज्यातील महावितरण, महापारेषण व महानिर्मिती कंपनीतील नियमित मंजूर रिक्त पदांवर अनुभवी, कुशल, वीज कंत्राटी कामगारांना सेवेत सामावून घेण्याच्या मागणीसाठी राज्यभरातील कंत्राटी वीज कामगार १ नोव्हेंबर रोजी मंत्रालयावर धडक मोर्चा काढणार आहेत.

महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ (संलग्न भारतीय मजदूर संघ) संघटनेच्या पुण्यात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मागील १५ ते २० वर्षांपासून फक्त १४ हजार, १५ हजार रुपये प्रतिमाह काम करत असलेल्या अनुभवी व कुशल वीज कंत्राटी कामगारांना कंत्राटदारविरहीत रोजंदारी पध्दतीने वयाच्या ६० वर्षांपर्यंत जॉब सिक्युरिटी देऊन सेवेत सामावून घेणे, समान वेतन द्यावे, संविधानिक शासकीय देय रकमेचा अपहार करणाऱ्या व कामगारांचे आर्थिक शोषण करणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्यात यावे आदी मागण्यांवर यात चर्चा करण्यात आली.

error: Content is protected !!