Home » Akola Politics : मूलभूत सेवांसाठी काँग्रेस मोर्चा

Akola Politics : मूलभूत सेवांसाठी काँग्रेस मोर्चा

Congress March : अकोला महानगरपालिकेवर धडकले नागरीक

by नवस्वराज
0 comment

Akola : महानगरात नागरीकांना मुलभुत सुविधा मिळत नसल्यामुळे अकोला काँग्रेस पदाधिकार्यांनी ता 8.2.2024 रोजी महानगरपालिकेवर भव्य मोर्चा नेला. काँग्रेस आरोग्य सेवासेल व महासचिव रवी शिंदे व माजी नगरसेविका चांदनी रवी शिंदे यांच्या नेतृत्वात मोर्चा नेण्यात आला.

रवी शिंदे जिल्हाध्यक्ष आरोग्य सेवा सेल व महासचिव अकोला महानगर काँग्रेस कमिटी व सौ चांदनी रवी शिंदे माजी नगरसेविका यांनी तारीख 08.02.2024 रोजी दुपारी बारा वाजता स्वराज्य भवन येथून अकोला महानगरपालिकावर यांच्या नेतृत्वात धडक मोर्चा काढण्यात आला प्रभाग क्रमांक 2 मधील मूलभूत सुविधा व नाल्यांमध्ये बांधकामामध्ये झालेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात दलित वस्ती निधी मध्ये न्याय मिळण्याकरिता व लाडिस फाईल संत कबीर नगर शंकर नगर सम्राट व्यायाम शाळा बापू नगर मेहमूद नगर बांबूवाडी मच्छी मार्केट आकोट रोड या परिसरातील रोड नाली रस्ते स्वच्छता व वाढीव टॅक्स आणि घरकुल योजना या सर्व समस्याच्या या विरोधात रवी शिंदे व सौ चांदणी रवी शिंदे माजी नगरसेविका यांच्या नेतृत्वामध्ये हजारोच्या संख्ये मध्ये अकोला महानगरपालिकेवर धडक मोर्चा नेण्यात आला. महानगरपालिका प्रशासनाला नागरीकांच्या समस्यांबाबत अवगत करण्यात आले. समस्यांचे निराकरण न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही दिला.

 

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!