Home » यशोमती ठाकूर, नागालॅन्डबाबत ‘तो’ उच्चार आणि नेटकऱ्यांचे मनोरंजन

यशोमती ठाकूर, नागालॅन्डबाबत ‘तो’ उच्चार आणि नेटकऱ्यांचे मनोरंजन

by Navswaraj
0 comment

नागपूर : मानवी तस्करीबाबत महाराष्ट्राच्या महिला व बालविकास मंत्री अॅड. यशोमती ठाकूर यांचा उच्चार चुकला आणि भाजपसह ट्रोलर्सनी अॅड. ठाकूर यांना चांगलेच टार्गेट केले. मात्र ठाकूर यांना टार्गेट करणाऱ्या भाजपच्या नेत्याकडूनही एक चूक झाल्याने अरे.. हे चाललय काय? असे नमूद करीत नेटकऱ्यांचे मनोरंजन झाले.


महिला आणि अल्पवयीन मुलींची तस्करी केली जाते या मुद्द्यावर अॅड. ठाकूर एका सरकारी कार्यक्रमात बोलत होत्या. बोलण्याचा ओघात त्यांच्याकडून नागालॅन्ड सारख्या देशांचा या तस्करीशी संबंध असल्याचा उल्लेख झाला. चूक लक्षात येताच त्यांनी नागालॅन्ड ऐवजी थायलॅन्ड अशी दुरूस्तीही केली. परंतु तोवर त्यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाला होता. भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सचिव वाय. सत्य कुमार यांनी हा व्हिडीओ ट्विट करीत काँग्रेसच्या मंत्र्यांसाठी नागालॅन्ड वेगळा देश आहे का? असा सवाल केला. मात्र ही पोस्ट टाकताना सत्य कुमार हे देखील चुकले. त्यांनी अॅड. ठाकूर यांचा उल्लेख ‘यशोमती तोमर’ असा केला.

यशोमती ठाकूर तर अनावधानाने चुकल्या पण सत्य कुमारजी टीका करताना नेत्यांची नावे तर अचूक घ्या अशा प्रतिक्रिया अनेकांनी या पोस्टवर व्यक्त केल्या. महाराष्ट्रातील राजकारण सध्या चांगलेच बदलले आहे. एकमेकांवर टीका करण्यात सध्या सर्वच राजकीय पक्ष धन्यता मानत आहे. अशात एक नेत्यांकडून झालेली चूक, त्यावर दुसऱ्या पक्षाच्या एका राष्ट्रीय नेत्याने केलेली टीका व त्यात देखील चूक इंटरनेटवर मनोरंजनात्मक विषय ठरली.

error: Content is protected !!