Home » रॅली आधी राहुल विचारतात, मला नेमके बोलायचेय काय?

रॅली आधी राहुल विचारतात, मला नेमके बोलायचेय काय?

by Navswaraj
0 comment

हैदराबाद : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार राहुल गांधी यांचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत तेलंगणातील शेतकरी रॅलीपूर्वी राहुल गांधी काँग्रेस नेत्यांसोबत चर्चा करताना दिसत आहेत. आजचा विषय काय? मला काय बोलायच आहे? असा प्रश्न राहुल सहकाऱ्यांना विचारताना दिसत आहेत. राहुल यांचे हे वाक्य व्हिडीओमध्ये स्पष्टपणे ऐकू येत असून भाजपने त्यांना यावरून लक्ष्य केले आहे.


भाजपा नेते अमित मालवीय यांनी राहुल गांधींचा हा व्हिडीओ शेअर करत त्यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘जेव्हा तुम्ही वैयक्तिक परदेशी सहली आणि नाईट क्लबिंगच्या मध्ये राजकारण करता तेव्हा असे होते’, असा टोलाही मालवीय यांनी राहुल गांधींना लगावला आहे. मालवीय यांनी राहुल गांधीचा एक व्हिडिओ शेअर केला होता. ज्यात ते नेपाळच्या एका नाईटक्लबमध्ये दिसून आले होते. त्यांच्यासोबत एक महिलाही होती. या व्हिडीओवरून राहुल गांधीवर भाजपाने टीकास्त्र सोडले होते.

error: Content is protected !!