Home » अकोल्यात ‘हेटस्पीच’ने भावना दुखावल्याची पोलिसांत तक्रार

अकोल्यात ‘हेटस्पीच’ने भावना दुखावल्याची पोलिसांत तक्रार

by Navswaraj
0 comment

अकोला : सर्व जाती, धर्मांना आपल्यात सामावून घेणारा, विश्वबंधुत्व आणि शांततेचा संदेश देणाऱ्या सनातन धर्माला संपविण्याचा प्रयत्न शेकडो वर्षांपासून सुरू आहे. तामिळनाडू राज्याचे युवक कल्याण व क्रीडा मंत्री उदनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माविषयी अपमानास्पद भाषेचा वापर करून धर्म संपवण्याचे वक्तव्य केले. त्याच राज्यातील द्रमुकचे खासदार ए. राजा, कर्नाटकचे ग्राम विकास मंत्री प्रियांक खर्गे तसेच महाराष्ट्रातील आमदार जितेंद्र आव्हाड आणि पत्रकार निखिल वागळे यांनी देखील सनातन धर्माविषयी आक्षेपार्ह विधान करून धार्मिक भावना दुखावल्या.

‘हेटस्पीच’ संदर्भातील सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेच्या संबंधातील २८ एप्रिल २०२३च्या आदेशात म्हटले आहे की, ‘हेटस्पीच’च्या घटनात शासनाने कोणी तक्रार दाखल करण्याची वाट न बघता स्वतः दखल घेऊन एफआयआर दाखल करावा. परंतु शासनाने या लोकांवर कुठलीही कारवाई न केल्यामुळे हिंदू जनजागृती समिती, सनातन धर्मप्रेमी संघटना, अधिवक्ता तसेच धर्मप्रेमी नागरीकांनी पुढाकार घेऊन उदयनिधी स्टॅलिन, प्रियांक खर्गे, ए. राजा, जितेंद्र आव्हाड तसेच निखिल वागळे यांनी सनातन धर्माविषयी अपमानास्पद भाषेचा वापर करून भावना दुखावल्यामुळे त्यांचे विरोधात भारतीय दंड संहिता कलम १५३ (अ) (ब) २९५(अ) २९८, ५०५ तसेच आयटी अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करावी, असे निवेदन खदान पोलिस स्टेशनला दिले.

अधिवक्ता श्रुती भट यांनी पोलिस निरीक्षक धनंजय सायरे यांना घडलेल्या प्रकाराची सविस्तर माहिती देऊन तातडीने कारवाई करण्याची मागणी केली. निवेदन देण्यासाठी शिवसेना शहर प्रमुख योगेश अग्रवाल, यशवंत पिसे, अमोल वानखेडे, अश्विनी सरोदे, रवी पांडे, विजयानंद टोपरे हिंदू जनजागृती समिती, संजय ठाकूर राष्ट्र जागृती मंच, सुनिल नारखेडे भारत स्वाभिमान, प्रशांत पाटील आदर्श गोसेवा, कैलास रणपिसे मराठा मढी संस्थान, मयुर मिश्रा करणीसेना, शशी चोपडे माजी नगरसेवक, रत्नदीप गणोजे, फुलचंद मौर्य, निता सोनवणे धर्मप्रेमी, अॅड. राधा मिश्रा, अॅड. अरूणा गुल्हाने, अॅड. मुकुंद जालनेकर, अॅड. नितिन गवळी, अॅड. पी. एम. जोशी, अॅड. ममता तिवारी, अॅड. वैष्णवी गिरी, अॅड. गजानन गुल्हाने, अॅड. कपिले तसेच सनातन संस्कृती महासंघाचे नरेंद्र कराळे आणि हेमंत जकाते उपस्थित होते.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!