Home » व्यवसायिक गॅस सिलेंडर महागले

व्यवसायिक गॅस सिलेंडर महागले

by Navswaraj
0 comment

मुंबई : १ ऑक्टोबर पासून अनेक गोष्टीत बदल झाला आहे. व्यवसायिक गॅस सिलिंडरचे दर वाढले आहेत. व्यवसायिक गॅस महागल्यामुळे हाॅटेलिंगसह काही गोष्टी महागणार आहेत. १९ किलोग्रामच्या व्यवसायिक गॅस सिलेंडरचे दरात २०० रुपयाने वाढ झाली आहे. आयओसीएल कंपनीच्या वेबसाईटवर तशी माहिती देण्यात आली आहे. ३० ऑगस्ट रोजी केंद्र सरकारच्या कॅबिनेटने निर्णय घेऊन घरगुती गॅस सिलिंडरची किंमत २०० रूपयाने कमी करून ग्राहकांना दिलासा दिला. घरगुती गॅस सिलिंडरचे भाव जैसेथे रहाणार आहेत, सप्टेंबर मधे असलेली किंमत या महिन्यात राहील.

नवीन दरवाढीनुसार नवी दिल्ली येथे १९ किलोग्राम वजनाच्या व्यवसायिक गॅस सिलिंडरचे दर १७३१.५०, कोलकाता मधे १८३९.५०, चेन्नईत १८९८.०० तर मुंबईत गॅसचे दर १६८४.०० रुपये झाले आहेत.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!