Home » प्रकाशभाऊं सोबत या…वडेट्टीवारांनी घातली आंबेडकरांना साद

प्रकाशभाऊं सोबत या…वडेट्टीवारांनी घातली आंबेडकरांना साद

by Navswaraj
0 comment

शेगाव (जि. बुलडाणा) : ‘महाराष्ट्रात सध्या अराजकता निर्माण झाली आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशासाठी मोठे योगदान दिले आहे. छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची स्थापना केली तर डॉ. आंबेडकरांनी संविधानाची. आज संविधानावरही संकट ओढवले आहे. त्यामुळे जातीयवादी शक्तीला हरविण्यासाठी प्रकाशभाऊंनी सोबत यावे, अशी साद विधानसभेचे विरोधी पक्षनेते व काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी घातली. बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव येथे त्यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना हे आवाहन केले.

सध्या काँग्रेसची जनसंवाद यात्रा सुरू आहे. ही यात्रा बुधवारी बुलडाणा जिल्ह्यात दाखल झाली. यात्रेदरम्यान वडेट्टीवार यांनी महाराष्ट्र प्रदेश सचिव रामविजय बुरुंगले यांच्या निवासस्थानी भेट दिली. त्यावेळी त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल मत व्यक्त केले. ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीत अॅड. आंबेडकरांना निमंत्रण देण्याची गरज नव्हती. देशातील जातीयवादी शक्तींच्या विरोधातील तो एल्गार होता. त्यामुळे अॅड. आंबेडकर यांनी सहमती दर्शविणारे पाऊल स्वत:हुन उचलायला हवे होते. मात्र पुढच्या बैठकीसाठी त्यांना आपल्याकडुन निमंत्रण नक्कीच जाईल, असे वडेट्टीवार म्हणाले.

मराठा आरक्षणाच्या बाबतीत निजाम काळातील नोंदींच्या आधारे जात प्रमाणपत्र देण्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्णय नवीन नाही. मराठा समाजाची दिशाभूल करणारे हे पाऊल आहे. ईडब्ल्यूएसच्या धर्तीवर सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यायला हवे, असे वडेट्टीवार यांनी नमूद केले.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!