Home » वाशीममध्ये हिजाब घातल्याने नीट परीक्षेदरम्यान विद्यार्थिनीला प्रवेश रोखला

वाशीममध्ये हिजाब घातल्याने नीट परीक्षेदरम्यान विद्यार्थिनीला प्रवेश रोखला

by नवस्वराज
0 comment

वाशीम : हिजाब घातलेल्या विद्यार्थिनीला नीट परीक्षेदरम्यान प्रवेश रोखल्याने वाशीममध्ये वाद निर्माण झाला आहे. मुलीला रोखणाऱ्या शिक्षकांची वागणूक बरोबर नसल्याने मुलीच्या पालकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे रविवारी देशातील सर्वात मोठी वैद्यकीय प्रवेश परीक्षा (नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट) घेण्यात आली. त्यावेळी वाशीम येथील मातोश्री शांताबाई गोटे महाविद्यालयात एका विद्यार्थिनीला हिजाब असल्याने रोखण्यात आले. त्यानंतर तणाव निर्माण झाला. केंद्रातील प्रशासकीय अधिकारी व सदस्यांनी गैरवर्तन केले, असा आरोप करण्यात आला. पीडित विद्यार्थिनीने सांगितले की, आधी परीक्षा कक्षात येण्यास मज्जाव करण्यात आला. नंतर हिजाब आणि बुरखा काढून टाका, असे सांगून बाहेर पाठवण्यात आले. बराच वादावादी झाल्यानंतर शेवटी रस्त्यावर बुरखा आणि हिजाब काढण्यात आला. परीक्षा कक्षात ही उपस्थित शिक्षकांचे वर्तन योग्य नसल्याचेही पीडित विद्यार्थिनीने म्हटले आहे.

वाशीम शहर पोलिस स्टेशन येथे तक्रार प्राप्त झाली आहे. संपूर्ण प्रकरणाची चौकशी ठाणेदार रफीक शेख हे करत आहे. चौकशीअंती योग्य ती कारवाई केली जाणार असल्याची माहिती वाशीमचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुनिल कुमार पुजारी यांनी दिली.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!