Home » मुख्यमंत्र्यांची विधानसभेत तुफान फटकेबाजी; ठाकरेंना टोले, पवारांना चिमटे!

मुख्यमंत्र्यांची विधानसभेत तुफान फटकेबाजी; ठाकरेंना टोले, पवारांना चिमटे!

by Navswaraj
0 comment

मुंबई : राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत तुफान फटकेबाजी केली. डिस्टन्स एज्युकेशन समजू शकतो. मात्र, आम्ही डिस्टन्स अॅडमिन्स्ट्रेशन अनुभवले म्हणत, त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टोलेबाजी केली. तर साखर झोपेतल्या शपथविधीच्या पुढची सुरस कथा देवेंद्र फडणवीस सांगतील तेव्हा शॉक बसेल म्हणत अजित पवारांना चिमटा काढला.

मुख्यमंत्री म्हणाले, हे सर्वसामान्यांचे सरकार आहे. सीएम रोडशो करतात, असे अजित पवार म्हणाले. मात्र, शरद पवारांनी सभा घेतल्या. ग्रुपला बोलावले. तुम्ही गाडी बदलून कुठे – कुठे गेलात? हे सगळे माहिती आहे. रात्री तीन वाजता आमच्याकडे फोटो आला होता. मोदींनी रोड शो केला आणि राज्य जिंकले. राहुल गांधींनी रोड शो केला आणि तिन्ही राज्य गेले. आठवले यांच्या पक्षाचे दोन आमदार आले. तुमचे मात्र, बेगाने शादी में अब्दुला दिवाना सुरू आहे. आमच्या कामाने मते जिंकू. मात्र, येणाऱ्या काळात निवडणुका आहेत. तुम्ही तिघे आहात. एकाची पार्टी उभी राहिली, तर दुसरा भजन करत बसेल का? मराठा आरक्षणासाठी प्रयत्न सुरू आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!