Home » दूषित पाणी पुरवठा आणि डोळ्याच्या साथीमुळे नागरीक हैराण

दूषित पाणी पुरवठा आणि डोळ्याच्या साथीमुळे नागरीक हैराण

by Navswaraj
0 comment

अकोला : गेल्या काही दिवसांपासून महानगरातील नळातून दूषित पाणी पुरवठा होतो आहे. त्यामुळे अनेक नागरीकांना पोटदूखी, उलटी, अतिसार व टाईफाॅईड ची लागण झाल्यामुळे सरकारी तसेच खाजगी रूग्णालयात, रूग्णांची संख्या वाढली आहे.

मागील आठवड्यापासून संपूर्ण जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे वातावरणात एकदम बदल झाला असून, महानगरात डोळ्यांची साथ आली आहे. डोळे लाल होऊन पाणी गळणे, चिटकणे, सुजणे, आग होणे यामुळे नागरीक त्रस्त झाले आहेत, लहान मुलात याचे प्रमाण जास्त आहे.

डोळ्यांची समस्या निर्माण झाल्यास, योग्य वैद्यकीय सल्ला घेऊनच डोळ्यांच्या औषधीचा वापर करावा, लहान मुलांच्या बाबतीत विशेष काळजी घ्यावी, असे एका नेत्ररोग तज्ञानी नवस्वराज ला सांगितले.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!