Home » Mumbai News सीआयडी मालिकेतील इंस्पेक्टर फ्रेड्रिक यांचे निधन 

Mumbai News सीआयडी मालिकेतील इंस्पेक्टर फ्रेड्रिक यांचे निधन 

by नवस्वराज
0 comment

Mumbai मुंबई : सोनी टिव्हीवर गाजलेली गुन्हेगारी मालिका सीआयडी मध्ये इंस्पेक्टर फ्रेड्रिक ची भूमिका करणारे 57 वर्षीय कलाकार दिनेश फडणीस यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांच्यावर मुंबईतील तुंगा रूग्णालयात उपचार सुरू होते. प्रकृती नाजूक असल्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. आज 5 डिसेंबरला त्यांची प्राणज्योत मालवली.( CID Tv Serial Actor Dinesh Phadnis Passes Away Today On 5 December) त्यांच्या निधनाची माहिती त्यांचे मित्र आणि सहकलाकार दयानंद शेट्टी यांनी दिली.

सीआयडी या टिव्ही मालिकेतील इंस्पेक्टर फ्रेड्रिक यांच्या गमतीदार भूमिकेमुळे प्रसिद्ध झालेले दिनेश फडणीस हे या मालिकेनंतर कुठलीही मालिका अथवा सिनेमात दिसले नाही. अभिनय सोडून त्यांनी मराठी चित्रपटांसाठी कथा लेखन सुरू केले. त्यांच्या अकाली निधनामुळे त्यांच्या चहात्यांमध्ये शोक पसरला आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!