Home » डॉ. प्रकाश आमटेंची मुख्यमंत्री शिंदेनी घेतली रुग्णालयात भेट

डॉ. प्रकाश आमटेंची मुख्यमंत्री शिंदेनी घेतली रुग्णालयात भेट

by Navswaraj
0 comment

पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात जाऊन डॉ. प्रकाश आमटे यांची भेट घेत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. डॉ. आमटे हे सध्या रक्ताच्या कर्करोगाने आजारी असून पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार घेत आहेत.

पुणे दौरा आटोपून रात्री त्यांनी डॉ.आमटे यांना भेटून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. प्रकृती साथ देत असली-नसली तरीही या आजाराला सकारात्मकरित्या तोंड देण्याची त्यांची जिद्द आणि या परिस्थितीत देखील आयुष्य समृद्धपणे जगण्याची इच्छा त्यांच्या देहबोलीतून जाणवली, असे मुख्यमंत्री म्हणाले. डॉ. आमटे यांच्या पत्नी डॉ. मंदाकिनी आमटे, पुत्र डॉ. कौस्तुभ आमटे आणि इतर कुटुंबियांशी बोलून मुख्यमंत्र्यांनी डॉ. प्रकाश आमटे यांच्यावर सुरू असलेल्या उपचारांची माहिती घेतली व डॉक्टरांशीही चर्चा केली.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!