Home » एकनाथ शिंदे यांनी जिंकला विश्वासदर्शक ठराव; मिळाली 164 मते

एकनाथ शिंदे यांनी जिंकला विश्वासदर्शक ठराव; मिळाली 164 मते

by Navswaraj
0 comment

मुंबई : विधान सभेच्या विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी एकनाथ शिंदे सरकारकडून विश्वासदर्शक मांडण्यात आला. १६४ आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या बाजूने मतदान केले, त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला.

मतदानादरम्यान सभागृहाचे दरवाजे बंद झाल्याने काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार, संग्राम जगताप, अण्णा बनसोडे, झिशान सिद्धीकी, धीरज देशमुख या आमदारांना सभागृहात जाता आले नाही. तब्बल सहा नेत्यांना उशीर झाल्यामुळे मतदान करता आले नाही. शिवसेनेचे युवानेते आदित्य ठाकरे हे देखील सभागृह बंद होण्याच्या शेवटच्या मिनीटाला पोहोचले. त्यामुळे आदित्य ठाकरे हे देखील मतदानापासून वंचित राहिले असते.

बहुमत चाचणी प्रक्रियेदरम्यान एकूण 22 आमदार गैरहजर राहिले. यामध्ये जितेश अंतापूरकर, जीशान सिद्दिकी, प्रणिती शिंदे, अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार, धीरज देशमुख, कुणाल पाटील, राजू आवळे, मोहन हंबर्डे आणि शिरीष चौधरी या काँग्रेसच्या 10 आमदारांचा समावेश आहे. कळमनुरीचे आमदार संतोष बांगर शिंदे गटात सहभागी झाले. विधानसभा अध्यक्ष यांना मतदानाचा अधिकार नसला, तरी सत्ताधारी पक्षाची १६४ ही संख्या कायम राहिली. विश्वासदर्शक ठरावात विरोधीपक्षाची 8 मते कमी झालीत. 107 मते विरोधी पक्षाकडे होती. विरोधी पक्ष 99 वर थांबला. 5 काँग्रेस आमदार अनुपस्थित राहिले. समाजवादी पार्टीही तटस्थ राहिले.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!