Home » अकोल्यातील तपे हनुमान मंदिरात छप्पन भोग, महाप्रसाद वितरण

अकोल्यातील तपे हनुमान मंदिरात छप्पन भोग, महाप्रसाद वितरण

by Navswaraj
0 comment

अकोला : विदर्भातील अकोला शहरातील अतिप्राचिन मातृभक्त तपे हनुमान मंदिरात रविवार, 6 नोव्हेंबर 2022 रोजी छप्पन भोग अर्पण करण्यात आला. हनुमंताच्या मूर्तीपुढे भोग अर्पण केल्यानंतर भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.

अकोल्यातील या तपे हनुमान मंदिरात माता अंजनीसोबत हनुमान विराजमान आहेत. हे मंदिर सुमारे 450 वर्षे प्राचिन आहे. अंजनीसोबत हनुमान असलेले हे विदर्भातील एकमेव मंदिर असल्याचे सांगितले जाते. तपे हनुमान मंदिरात अखंड दिवा तेवत असतो.  दर पौर्णिमेला महाप्रसादाची परंपरा येथे अखंडपणे सुरू आहे. मंगळवार, शनिवार आणि पौर्णिमेला महिला-पुरुष, बालगोपाल मोठ्या भक्तिभावाने दर्शनाठी रीघ लावतात. तपे हनुमान अनेकांच्या ईच्छा पूर्ण करतो अशी भाविकांची श्रद्धा आहे. दिवसेंदिवस तपे हनुमान मंदिरात येणाऱ्या भक्तांची संख्या वाढत आहे. कार्तिक पौर्णिमेच्या निमित्ताने रविवारीही अनेक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला, अशी माहिती मंदिराचे पुजारी पंडीत भारत शर्मा यांनी दिली.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!