Home » चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार शिंदे गटासोबत

चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार शिंदे गटासोबत

by Navswaraj
0 comment

चंद्रपूर : महाविकास आघाडीला समर्थन देणारे चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनीही अखेर गुवाहाटीचा रस्ता धरला आहे. आमदार जोरगेवार यांच्याशी शिंदे गटाने संपर्क साधला होता. मात्र मतदारसंघातील समर्थकांशी चर्चा केल्यावर निर्णय घेऊ, अशी भूमिका जोरगेवारांनी घेतली होती. त्यानंतर ४८ तासांतच जोरगेवार शिंदे गटात सामील झाले आहेत.

दोन दिवसांपूर्वी शिवसेनेच्या बंडखोर गटाकडून निरोप आला असल्याची माहिती आमदार किशोर जोरगेवार यांनी दिली. तसेच शिवसेनेतून फुटून बाहेर आलेल्या एकनाथ शिंदे यांच्या गटाला आणखी काही आमदारांचे समर्थन भविष्यात अपेक्षित असल्याचा मोठा गौप्यस्फोट किशोर जोरगेवार यांनी केला होता. आता किशोर जोरगेवार शिंदे गटात सामिल झाल्याने त्यांच्या या भूमिकेचे पडसाद मतदारसंघात कसे उमटतील, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!