Home » ठाकरेंची सभा उधळुन दाखवाच : भुजबळ

ठाकरेंची सभा उधळुन दाखवाच : भुजबळ

by नवस्वराज
0 comment

नागपूर : ‘तुम्ही ज्या शाळेत शिकता, त्या शाळेचे उद्धव ठाकरे हे हेडमास्तर आहेत. त्यामुळे हिंमत असेल तर वल्गना करण्यापेक्षा उद्धव ठाकरे यांची सभा उधळुन दाखवाच’, असे आव्हान माजी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी विरोधकांना दिले. नागपुरात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरे यांची सभा उधळण्याची भाषा केली. त्यावरून ठाकरे गट आक्रमक झाला. तुम्ही सभेत घुसून दाखवाचं, असे आव्हान ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी दिले. शिवाय सभेत घुसून दाखवा आम्ही तुम्हाला ५१ हजार रुपयांचे बक्षीस देऊ, असंही जाहीर केलं. त्याचबरोबर तुम्ही ठाकरे यांच्या सभेत घुसून दाखवा कसे बाहेर पडता ते आम्ही बघू असा दमही ठाकरे गटाच्या वतीने देण्यात आला. या सर्व प्रकरणानंतर छगन भुजबळ यांनी नागपुरात मोठी प्रतिक्रिया दिली.

‘गुलाबराव पाटील तुम्ही दगड मारून सभा उधळणार असाल, तर त्या सभेत येणारे लोकं काही कमी नाहीत. जिथून तुम्ही हे शिक्षण घेतले तिथले हेडमास्टर उद्धव ठाकरे आहेत’, असे भुजबळ म्हणाले. मराठा समाजाला आरक्षण द्या, आमचा विरोध नाही. मात्र ते आरक्षण ओबीसीमधून नको. ओबीसीच्या २७ टक्के आरक्षणामध्ये आधीच खूप गर्दी झाली आहे. इतर अनेक जातींना ओबीसीमधून आरक्षण दिले. त्यामुळे आधीच ओबीसी समाजासाठी फक्त १७ टक्केच आरक्षण शिल्लक राहिले आहे, असे छगन भुजबळ यांनी सांगितले.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!