Home » महाराष्ट्रातील राजकीय संकटावर गडकरी म्हणाले…

महाराष्ट्रातील राजकीय संकटावर गडकरी म्हणाले…

by Navswaraj
0 comment

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यातील राजकीय भूकंपावर प्रतिक्रिया दिली आहे. लवकरच परिस्थिती स्पष्ट होईल, असे सूचक वक्तव्य नितीन गडकरी यांनी केले आहे.

“मला वाटते की महाराष्ट्रावरील संकट लवकरच दूर होईल. आगे आगे देखो होता है क्या. आजच्या समस्येमध्येच उद्याचे उत्तर लपलेले असते. लवकरच याबाबत सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील. लवकरच परिस्थिती स्पष्ट होईल. अंधार निघून जाईल आणि सूर्य उगवेल. वैयक्तिक संबंध हे राजकाराणापेक्षा वेगळे असतात. ते सरकारमध्ये असोत किंवा नसोत संबंध तेच राहतात. राजकारण वेगळे असते”, असे ते म्हणाले. मी राज्यातल्या राजकारणावर जास्त बोलणार नाही. पण एवढं नक्की सांगेन की शिवसेना आणि भाजपा एकत्र आले तर माझ्यासारख्या व्यक्तीला आनंदच होईल, असेही ते एका कार्यक्रमात म्हणाले.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!