Home » वजन कमी केले म्हणून गडकरी ‘त्यांना’ देणार १५ हजार कोटी

वजन कमी केले म्हणून गडकरी ‘त्यांना’ देणार १५ हजार कोटी

by Navswaraj
0 comment

उज्जैन (भोपाळ) : केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी उज्जैनमध्ये भाजपा खासदार अनिल फिरोजिया यांना वजन कमी करण्याचं आव्हान दिले आहे. अनिल फिरोजिया यांनी कमी केलेल्या प्रत्येक एक किलो वजनामागे १००० कोटी रुपये विकास निधी देण्याची घोषणा केली. यानंतर खासदार फिरोजिया यांनी ४ महिन्यात १५ किलोग्रॅम वजन कमी केलं. त्यामुळे त्यांना गडकरींकडून १५,००० कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे.

नितीन गडकरी २४ फेब्रुवारीला उज्जैनला विकास कामांच्या लोकार्पणासाठी आले असताना त्यांनी हे वक्तव्य केले होते. गडकरींनी खासदार अनिल फिरोजिया यांना आव्हान दिले त्यावेळी त्यांचे वजन १२७ किलो होते.  ही बाब गंभीरतेने घेत अनिल फिरोजिया यांनी तातडीने व्यायामाला सुरुवात केली. खाण्याचे शौकीन असणाऱ्या फिरोजिया यांनी व्यायामासोबतच डायट देखील सुरू केला. ४ महिन्यांच्या सातत्यापूर्ण व्यायाम आणि आहाराच्या सतर्कतेनंतर आता फिरोजिया यांनी १५ किलो वजन कमी केलं. यासह ते १५,००० कोटी रुपये विकास निधी मिळवण्यास पात्र झाले आहेत.

error: Content is protected !!