Home » नागपुरातील फुटाळा तलाव परिसराचा मेकओव्हर : गडकरी

नागपुरातील फुटाळा तलाव परिसराचा मेकओव्हर : गडकरी

by नवस्वराज
0 comment

नागपूर : फुटाळा तलावात असणारे संगीत कारंजे नागपूरचा इतिहास सांगणारे असून या इतिहासाची हिंदी मधली कॉमेंट्री अमिताभ बच्चन यांच्या आवाजात तर मराठीतली कॉमेंट्री नाना पाटेकर यांच्या आवाजात राहिल. हे कारंजे पाहण्यासाठी फुटाळा तलावाजवळ दर्शक गॅलरी ही 400 आसन क्षमतेची राहणार आहे. फुटाळ्याच्या पुढेच 12 मजली फूड-प्लाझा  1100 वाहनांच्या पार्किंग व्यवस्थेसह  उभारण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्रीय महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांनी दिली.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या आणि नागपूरच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या फुटाळा म्युझिकल फाऊंटन आणि लाईट-शो प्रकल्पाची लोकार्पणापूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी  पाहणी केली, त्यावेळी ते बोलत होते.

केंद्रीय रस्ते निधीमधुन 30 कोटी रुपये डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठाला देण्यात आले आहेत. फुटाळ्याजवळील विद्यापीठ उद्यानात देश-विदेशातील पुष्पांच्या जाती आणून येथील पुष्पविविधता वाढवण्यात येणार आहे, अशी माहिती सुद्धा त्यांनी दिली. या कारंजाच्या निर्मिती साठी विश्वस्तरावरील आर्किटेक्ट नागपुरात आले असून फाऊंटनच्या हार्डवेअरची प्राथामिक चाचणी गडकरी यांनी पाहिली.  या फाऊंटेनच्या निर्मितीसाठी हातभार लावणारे नागपूर सुधार प्रन्यास, महामेट्रो तसेच या प्रकल्पाचे कंत्राटदार यांचेही आभार गडकरी यांनी मानले. याप्रसंगी उपस्थित तामिळ फिल्म क्षेत्रातील गायिका रेवती यांनीसुद्धा या प्रकल्पाच्या संगीत नियोजनाविषयी माहिती दिली.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!