Home » महाराष्ट्रातील ११ पोलिसांना केंद्रीय गृहमंत्री पदक

महाराष्ट्रातील ११ पोलिसांना केंद्रीय गृहमंत्री पदक

by नवस्वराज
0 comment

नवी दिल्ली : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना महाराष्ट्रातील ११ पोलिस अधिकाऱ्यांना केंद्रीय गृहमंत्री पदकाने सन्मानित केले जाणार आहे. १५ ऑगस्टला शासकीय कार्यक्रमांमध्ये या अधिकाऱ्यांना सन्मानित केले जाणार आहे.

देशभरातून १५१ अधिकाऱ्यांना केंद्रीय गृहमंत्री पदक बहाल करण्यात आले. त्यात सीबीआयच्या १५, महाराष्ट्रातील ११, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातील प्रत्येकी १०, केरळ, राजस्थान, पश्चिम बंगाल येथील प्रत्येकी ८ अधिकारी, कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. २८ महिलांनीही पदक प्राप्त केले आहे. महाराष्ट्रातून आयपीएस अधिकारी कृष्णकांत उपाध्याय, पोलिस उपअधीक्षक अशोक तानाजी विरकर, अजित भागवत पाटील, पोलिस निरीक्षक प्रमोद भास्कर तोरडमल, दिलीप शिशुपाल पवार, दीपशिखा दीपक मावर, सुरेश नरसाहेब राऊत, जितेंद्र बोडप्पा वनकोटी, समीर सुरेश अहिरराव, सहाय्यक पोलिस निरीक्षक राणी तुकाराम काळे, मनोज पवार यांचा समावेश आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!