Home » चाईल्ड पॉर्न : नागपूरसह सीबीआयचे देशभरात 21 ठिकाणी छापे

चाईल्ड पॉर्न : नागपूरसह सीबीआयचे देशभरात 21 ठिकाणी छापे

by Navswaraj
0 comment

नागपूर : चाईल्ड पॉर्नप्रकरणी सीबीआयने नागपूरसह देशभरात 21 ठिकाणी शनिवार, 24 सप्टेंबर रोजी एकाच वेळी छापे घातले. याबाबत खास ऑपरेशन मेघचक्र राबविण्यात आले. सीबीआयने याबाबत दोन गुन्हे दाखल केले आहेत. क्राइम अगेन्स्ट चिल्ड्रनच्या (इंटरपोल) सिंगापूर शाखेने याबाबत सीबीआयला माहिती दिली होती.

अनेक भारतीय नागरिकांचा क्लाउड-आधारित स्टोरेज वापरून बाल लैंगिक शोषण सामग्रीच्या (पॉर्न) संचालन, डाउनलोडिंग, ट्रान्समिशनमध्ये गुंतल्याचा आरोप करण्यात आला होता. झडतीदरम्यान ५० हून अधिक संशयितांचे मोबाईल, लॅपटॉपसह इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त करण्यात आली आहेत. सायबर फॉरेन्सिक साधनांचा वापर करून या इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या प्राथमिक तपासणीत अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये मोठ्या प्रमाणात चाईल्ड पॉर्न सापडले आहेत.  बाल पीडित आणि अत्याचार करणार्‍यांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. नागपूरसोबत मुंबई, पुणे, नाशिक, ठाणे, नांदेड, सोलापूर, कोल्हापूर येथेही सीबीआयच्या पथकांनी एकाच वेळी छापे घातले.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!