Home » Crime News : आंतरजातीय प्रेम प्रकरणातून अकोल्याात ‘ऑनर किलिंग’

Crime News : आंतरजातीय प्रेम प्रकरणातून अकोल्याात ‘ऑनर किलिंग’

Titva Village : बाप-लेकानेच संपविले कुटुंबातील मुलाला

by नवस्वराज
0 comment

भुषण इंदोरिया | Bhushan Indoriya 

Titva Village : अनुसूचित जाती वर्गातील मुलीवर प्रेम केल्याच्या कारणावरुन वडिलांनीच पोटच्या मुलाला संपविले पिंजर पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या टिटवा गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. संदीप नागोराव गावंडे (वय २६) असे मृत तरुणाच नाव आहे.

संदीपच्या घरातील लोक बाहेर गेले होते. घरी परतले असता त्यांना संदीप मृत अवस्थेत दिसून आल्याने त्यांनी टाहो फोडला. याची माहिती पिंजर पोलिसांना देण्यात आली. पिंजर पोलिसांनी घटनास्थळ गाठले. पोलिसांनी पंचनामा करून तपासादरम्यान वडिलांनीच मुलाची हत्या केल्याचे निष्पन्न झाले. संदीप हा पुण्यातील एका कंपनीत कामाला होता.

संदीपच गावातील एका अनुसूचित जाती वर्गातील कुटुंबातील मुलीवर प्रेम होते. त्यांनी लग्न करण्याचा निश्चय घेतला. परंतु हे संदीपचे वडील नागोराव यांना हे मान्य नव्हते. याच्यावरून अनेकदा त्यांच्या घरात वाद व्हायचा. त्यामुळे दोघांनी पळून जाऊन लग्न करण्याचे ठरवले. ही गोष्ट संदीपच्या वडिलांना समजली.

अनुसूचित जाती वर्गातील मुलीवर प्रेम का केले आणि लग्नही करतो, असा सवाल वडील नागोराव यांनी करून मृत संदीपसोबत वाद घातला. अश्यात त्याच्याच भावाने आणि वडिलांनी घरातच संदीपचा गळा आवळून संपवले. त्यानंतर संदीपचे हातपाय वायरने बांधून घराला कुलूप लावून बाहेरगावी निघून गेले. घरी परतल्यानंतर आपल्या मुलाला कोणीतरी मारले, असा बनाव त्यांनी केला. पोलिसांच्या तपासात हे बिंग फुटले. सद्य:स्थितीत मारेकरी वडील आणि भाऊ पोलिसांच्या ताब्यात आहेत.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!