Home » Mehekar Toll : ‘समृद्धी’वरील मेहकर टोल नाका कर्मचाऱ्यांनीच केला बंद

Mehekar Toll : ‘समृद्धी’वरील मेहकर टोल नाका कर्मचाऱ्यांनीच केला बंद

by Navswaraj
0 comment

Buldhana : समृद्धी महामार्गावर असलेला मेहकर टोलनाका कर्मचाऱ्यांनीच बंद केल्याची घटना घडली आहे. बुधवारी (ता. १५) मेहकर टोल नाक्यावर कामबंद आंदोलन करण्यात आले. संतप्त कर्मचाऱ्यांनी घोषणाबाजी केली. त्यामुळे टोलनाक्यावरून वाहनांना मोफत जाण्याची संधी मिळाली. (Buldhana’s Mehekar Samruddhi Highway Toll Employees Strike For Salary)

टोल वसूल करणाऱ्या कंपनीला लाखोंची कमाई मिळवून देणाऱ्या कर्मचाऱ्यांना मागील दोन महिन्यांपासून वेतनच मिळाले नसल्याने या संतप्त कर्मचाऱ्यांनी बुधवारी आंदोलनात्मक भूमिका घेतली. दिवाळी असल्याने किमान याकाळात तरी वेतन मिळेल अशी कर्मचाऱ्यांना अपेक्षा होती. मात्र दिवाळी होऊन गेल्यानंतरही कर्मचाऱ्यांना वेतन न मिळाल्याने आता या कर्मचाऱ्यांचा संयम सुटला आहे. कंपनीने अद्याप कर्मचाऱ्यांचे पीएफ खातेही उघडलेले नाही. वसुली करणाऱ्या कंपन्यांमध्ये बदल झाल्यानंतर वेतनाचा हा प्रश्न निर्माण झाला आहे. टोल वसुली करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अद्याप पगारपत्रकही देण्यात आलेले नाही.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!