Home » Buldhana News : कट्टा खरेदी करताना पुण्यातील दोघांना जळगावात अटक

Buldhana News : कट्टा खरेदी करताना पुण्यातील दोघांना जळगावात अटक

by नवस्वराज
0 comment

Buldhana | बुलढाणा : देशी कट्टे खरेदीसाठी पुणे येथुन आलेल्या दोघांसह चार जणांना देशी कट्टा व सात जीवंत काडतुसांसह रंगेहात पकडण्यात आले. बुलढाणा गुन्हे शाखेने ही कारवाई केली. (Buldhana Police Arrested Two Person Of Pune While Purchasing Gun at Jalgaon Jamod)

कारवाईत 12 लाखांची महागडी चारचाकी देखील जप्त करण्यात आली. जळगाव जामोद ( जि. बुलढाणा) नजीकच्या गोराळा धरण परिसरात स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली. चारजण घटनास्थळावरून पसार झालेत. मोहम्मद अख्तर शेख मुश्ताक (वाशिम बायपास, अकोला), फहदखान फारुखखान (भवानीपेठ, पुणे), तौसिफ करीमखान (रविवार पेठ पुणे), रामसिंग भवानसिंग मुझाल्दा (निमखेडी, तालुका जळगाव जामोद) ही अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. अकोला येथील मध्यस्थामार्फत पुणे येथील दोघे कट्टा खरेदीसाठी आले होते. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली विलास सानप, दीपक लेकुरवाळे, गणेश पाटील, पुरुषोत्तम आघाव, गजानन गोरले, राजू आडवे यांनी कारवाई केली.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!