Home » बुलढाणा जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा; काँग्रेसची निदर्शने

बुलढाणा जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा; काँग्रेसची निदर्शने

by Navswaraj
0 comment

खामगाव : पावसाची अनियमितता आणि विविध प्रकारच्या रोगराईमुळे सोयाबीनचे पीक हातचे गले आहे. त्यामुळे बुलढाणा जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करून सोयाबीन उत्पादक शेतकर्यांना नुकसान भरपाईच्या मागणीसाठी काँग्रेसच्यावतीने उपविभागीय अधिकार्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आले.

माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांच्या नेतृत्वात देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले की, बुलढाणा जिल्ह्यातील सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे. अस्मानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांची काही व्यापाऱ्यांकडून अडवणूक केली जात आहे. निवेदनावर माजी आमदार दिलीपकुमार सानंदा, शहराध्यक्ष सरस्वती खासने, मनोज वानखडे, विजय काटोले, सुरजीत कौर सलुजा, कृउबास सभापती सुभाष पेसोडे, भारती पाटील, माजी नगरसेवक किशोरआप्पा भोसले, रोहित राजपूत, डॉ. सदानंद धनोकार, सुरेशसिंह तोमर, सुरेश वनारे यांच्यासह आदींच्या स्वाक्षरी आहेत.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!