Home » शिवसेना आई ना? मग तिला काँग्रेसच्या दावणीला कसे बांधता : गायकवाड

शिवसेना आई ना? मग तिला काँग्रेसच्या दावणीला कसे बांधता : गायकवाड

by Navswaraj
0 comment

बुलडाणा : ‘ज्या शिवसेनेला तुम्ही आई म्हणता, आम्हीही आई मानतो. मग, ती तुम्ही काँग्रेसच्या दावणीला कशी बांधता?’, असे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी नमूद करीत उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली.

आमदार संजय गायकवाड म्हणाले की, निवडणूक आयोगाने धनुष्यबाण हे चिन्ह गोठविण्याचा निर्णय त्यांच्या अधिकारात घेतला आहे. पण, त्यावरून जे आरोप चालले आहेत, त्यात कोणी म्हणतंय ही भारतीय जनता पक्षाची बी टीम आहे. कुणी म्हणतंय आपल्या आईला बाजारात विकलं. पण हे चाळीस आमदार दुखावले आहेत. तुमच्या परिवारातील तुमची सून, तुमचा पोरगा, तुमचा नातू चालला आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा सेवक थापा चाललाय. मग या लोकांनी किती खोकी घेतली आहेत. दुखावलेल्या शिवसेनेच्या ४० आमदारांना तुम्ही परत आणलं असते, तर आज ही वेळ आली असती का? याचे आत्मपरीक्षण ठाकरे गटाच्या लोकांनी करायला पाहिजे. ज्या शिवसेनेला तुम्ही आई म्हणता, आम्हीपण मानतो. मग ती तुम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीच्या दावणीला बांधता, हे कितपत योग्य आहे,असा सवालही आमदार गायकवाड यांनी उपस्थित केला.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!