Home » आमदार गायकवाड म्हणतात; मंत्रिमंडळ विस्तार काही तासांत

आमदार गायकवाड म्हणतात; मंत्रिमंडळ विस्तार काही तासांत

by Navswaraj
0 comment

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा मुहूर्त कोणत्याही क्षणी लागेल अशी भविष्यवाणी बुलडाण्याचे शिंदे समर्थक आमदार संजय गायकवाड यांनी केली आहे.

मंत्रिमंडळाचा विस्तार काही तासाaतच होऊ शकतो. मंत्रिमंडळ विस्ताराच्या अनुषंगानेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्ली दौऱ्यावर असल्याचे त्यांनी सांगितले. ‘लवकरात लवकर..’ असे उत्तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर दौऱ्यावर असताना अनेकदा देत असतात. अशात आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या घोषणेमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. चर्चेतील नावांमध्ये शिंदे गटातून संजय शिरसाट, योगेश कदम, प्रताप सरनाईक, संजय गायकवाड, सुहास कांदे, भरत गोगावले यांची नावे आहेत भाजपमधुन डॉ. संजय कुटे, आशिष शेलार, गोपीचंद पडळकर, राम शिंदे, नितेश राणे, देवयानी फरांदे, प्रवीण दरेकर यांची नावे आघाडीवर आहेत.

आपल्याला  दगड धोंडा गृहीत धरत यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या चिखलात टाकले होते. त्या चिखलातून झेप घेऊन आम्ही बाहेर पडलो आणि आता नैसर्गिक युतीसोबत आम्ही काम करत आहोत. बाळासाहेब कुणाची प्रायव्हेट मालमत्ता नाही. राष्ट्रपुरुष सगळ्यांचे असतात. त्यांचा फोटो आणि कार्यक्रम सादर करण्याचे अधिकार भारतातल्या प्रत्येक नागरिकाला आहेत. वैयक्तिक कुणी हक्क सांगू शकत नाही’, असे गायकवाड एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!