Home » बुलडाण्याचा प्रथमेश जावरकर वर्ल्ड चॅम्पियन

बुलडाण्याचा प्रथमेश जावरकर वर्ल्ड चॅम्पियन

by Navswaraj
0 comment

शांघाय : वर्ल्डकप स्टेज-२ मध्ये वैयक्तिक कंपाउंड प्रकारामध्ये बुलडाण्याचा युवा तिरंदाज प्रथमेश जावकर आणि नागपूरचा ओजस देवतळे शनिवारी वर्ल्ड चॅम्पियन ठरले आहेत. विदर्भातील या १९ वर्षीय खेळाडूने हे यश संपादन करीत बुलडाण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

प्रथमेशने एका गुणाच्या आघाडीने जगातील नंबर वन माइकचा पराभव केला. त्याने १४९-१४८ ने सामना जिंकून सुवर्णपदकाचा बहुमान पटकावला. तो पदार्पणात चॅम्पियन होण्याचा मानकरी ठरला आहे. संत्रानगरी नागपूरच्या ओजसनेही चॅम्पियनशिप पटकावली आहे. सहकारी ज्योतीसोबत कंपाउंडच्या मिश्र गटात सुवर्ण पदकाचे लक्ष्य भेदले. भारताच्या या जोडीने फायनलमध्ये कोरीयाच्या अव्वल मानांकित जोंघो ओहचा १५६-१५५ ने पराभव केला. त्यामुळे ओजस व ज्योतीला विश्वचषकात सुवर्णपदक जिंकण्याचा क्रम कायम ठेवता आला. या दोघांनी गेल्या महिन्यात अंत्याला येथे वर्ल्डकप स्टेज-१ मध्येही सुवर्णपदक पटकावले होते.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!